waterborne diseases : पावसाळा कालावधीतील जलजन्य आजारांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना सुदृढ आणि निरोगी आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे. तसेच पावसाळा कालावधीतील जलजन्य आजारांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्य यंत्रणेअंतर्गत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिले. पावसाळी आजार प्रतिबंध आणि नियंत्रण आढावा बैठकीच्या निमित्ताने त्यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला आगामी पावसाळा कालावधीसाठी पूरक तयारी करण्याचे निर्देश दिले.



पावसाळी आजारांच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांमध्ये जलजन्य आजारांबाबत पुरेशी जनजागृती करण्यासाठी विभागनिहाय पातळीवर पुढाकार घेण्यात यावा. महानगरपालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयाच्या ठिकाणी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. काही प्रभागांमध्ये लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी पावसाळी आजारांच्या अनुषंगाने रूग्णसंख्या कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही भांदिर्गे म्हणाले. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता आणि उपनगरीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.



जलजन्य आजारांच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिकेमार्फत सादरीकरण करण्यात आले. यावेळी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना, मूषक नियंत्रण, लेप्टोस्पायरेसिसच्या आजाराच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेच्या माध्यमातून जलजन्य आजारांच्या अनुषंगाने प्रमुख तसेच उपनगरीय रूग्णालयामध्ये उपलब्ध रुग्णशय्यांच्या अतिरिक्त उपलब्ध संख्येबाबतही माहिती यावेळी महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली.



महिलांच्या आरोग्याच्या अनुषंगाने अत्यंत गरजेची मॅमोग्राफी चाचणी करण्यासाठी अधिकाधिक महिलांना माहिती देण्यात यावी. तसेच कर्करोग चाचणीच्या अनुषंगाने मॅमोग्राफी चाचणी ही अधिकाधिक रूग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने जनजागृती करण्याचे निर्देश हरीश भांदिर्गे यांनी यंत्रणेला दिले. येत्या कालावधीत अधिकाधिक महिलांना या चाचणीला लाभ मिळावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मनुष्यबळाने प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता