मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान १ टनापेक्षा जास्त वजन असलेल्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे. मूर्तीची निर्मिती, वाहतूक आणि मंडपापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेची माहितीही महापालिकेकडे नोंदवली जाणार आहे. (Ganesh Idol Fitness Certificate)
भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मोठ्या आणि जड गणेशमूर्तींच्या वाहतुकीवर विशेष देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. ...
मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र :
नव्या नियमांनुसार, १ टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक असणार आहे. मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून तिची निर्मिती पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर मंडळाच्या मंडपात सुरक्षितपणे पोहोचेपर्यंतची आवश्यक माहिती BMC कडे नोंदवली जाणार आहे. जड आणि उंच मूर्तींची वाहतूक करताना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांच्या आगमनाच्या मार्गावर पालिका प्रशासनाकडून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. (BMC Ganesh Idol Fitness Certificate)
विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी बैठक :
मोठ्या गणेशमूर्तींची सुरक्षित वाहतूक आणि व्यवस्थापनासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याच्या दृष्टीने DMC झोन-२चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तींची सुरक्षितता, वाहतूक आणि आगमनासंदर्भातील अंतिम नियम निश्चित करण्यावर चर्चा करण्यात आली. BMCचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते विभाग तसेच सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाचे मार्ग पूर्णपणे खड्डेमुक्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (Ganesh Idol Fitness Certificate)
भुलेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?
भायखळा येथील गणेशमूर्ती कार्यशाळेतून ‘भुलेश्वरचा राजा’ या भव्य गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक सुरू होती. मंडपापासून अवघ्या काही अंतरावर असताना ही मूर्ती अचानक कोसळली. या दुर्घटनेत संकेत नेवशे आणि ब्रिजेश या दोघांचा मृत्यू झाला. ही मूर्ती थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिरातील गणेशमूर्तीच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भायखळा येथील मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी ती तयार केली होती. (Ganesh Idol Fitness Certificate)
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
आगमनाच्या प्रवासादरम्यान मूर्तीच्या गळ्यातील हार निसटला होता, तसेच पाठीमागील वेल्डिंगही सुटल्याचे सांगण्यात येते. भुलेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा हार निसटला आणि अचानक वेल्डिंग तुटल्याने सुमारे दोन टन वजनाची भव्य मूर्ती कार्यकर्त्यांच्या अंगावर कोसळली. संकेत आणि ब्रिजेश यांनी मूर्तीला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या दुर्घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली. संकेत यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर ब्रिजेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Ganesh Idol Fitness Certificate)