Yogesh Kadam : मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता रात्री ९ ते सकाळी ८ पर्यंत पोलीस

गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि ड्रग्सबाबत २५ दिवसांत निर्णय - गृहराज्यमंत्री योगेश कदम


मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता लोकलच्या महिला डब्यांमध्ये रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस-गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. आज विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुंबई लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुख्य मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम(Yogesh Kadam) यांनी सांगितलं की, यापूर्वी ही सुरक्षा केवळ सकाळी ६ वाजेपर्यंतच असायची, मात्र आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत शासनाने ही वेळ आता २ तासांनी वाढवली आहे.


गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि अमली पदार्थांविरोधात कडक पावले


रेल्वे स्थानक आणि परिसरात वाढणाऱ्या गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर आणि ड्रग्जच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा आखली आहे. रेल्वे पोलिसांच्या आयुक्तांसोबत येत्या १५ दिवसांत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून, स्थानक परिसरात ड्रग्ज पुरवठा नक्की कुठून होतो याचा शोध घेतला जाईल. तसेच, पुढील २५ दिवसांत अशा संशयित आणि उपद्रवी घटकांचा पूर्वेतिहास (record) तपासून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत.


वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे अपघातांवर उपाययोजना


मुंबई उपनगरीय लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून यातून दररोज सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. अपघात कमी करण्याच्या उद्देशाने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकल १५ डब्यांच्या करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत.




  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सध्या सुरू असलेल्या उपाययोजना

  • कार्यक्षेत्रातील एकूण १७७ रेल्वे स्थानकांवर सध्या ६,८९९ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.

  • रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी शासनाने २००० होमगार्ड आणि १५० एमएसएफ (MSF) जवानांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी सध्या १५२० होमगार्ड आणि ११२ एमएसएफ जवान प्रत्यक्ष सेवेत तैनात आहेत.

  • रेल्वे स्थानकांवर प्रत्यक्ष गस्त (व्हिसिबल पोलिसिंग) वाढवण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची ओळख तत्परतेने पटवण्यासाठी 'फेसिअल रेकगनिशन सिस्टीम' (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) सारख्या आधुनिक साधनांचा वापर केला जात आहे.

  • प्रत्येक रेल्वे स्थानकावर संशयित बॅगांची तपासणी केली जाते, तर मुख्य टर्मिनसच्या ठिकाणी स्कॅनरद्वारे बॅगा तपासल्या जातात.

  • प्रवाशांच्या तातडीच्या मदतीसाठी १५१२ ही हेल्पलाईन २४ तास कार्यरत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निवारण करून प्रवाशांना त्यांचे गहाळ झालेले कोट्यवधी रुपये आणि सामान परत मिळवून देण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक