Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.



१० हजारांहून अधिक पोलीस तैनात


ईद-ए-मिलादचा उत्सव नागरिकांनी शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, यासाठी ८ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५६ सहायक पोलीस आयुक्त, १,६१८ पोलीस अधिकारी आणि ८,३२५ पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.


नियमित पोलीस बंदोबस्तासोबतच एसआरपीएफ, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा टीम आणि कॉम्बॅट टीम यांनाही महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.


मुंबई पोलिसांकडून नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः मिरवणूक आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे पोलिसांनी सांगितले.


तसेच, कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याला हात न लावता तात्काळ १०० किंवा ११२ या क्रमांकावर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून