'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी
यात्सुशिरो (जपान): जपानमध्ये सुरू असलेल्या 'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर मिक्स्ड टीम चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या 'गट सी'मधील सलामीच्या सामन्यात भारताने कझाकिस्तानचा २-० (५५-३१, ५५-२१) असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता गटातील अव्वल स्थान ठरवण्यासाठी भारताचा सामना चायनीज तैपेईशी होणार आहे.
Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र
मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी शहरात तसेच अनेक ...
सामन्याची सुरुवात महिला दुहेरीत दुर्गा ईशा कांड्रपू आणि कीर्ती मंचला यांनी ११-५ असा विजय मिळवून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत पुनीत सुरेश आणि दीप्ती राज अदिती यांनी अटीतटीच्या लढतीत ११-१० अशा फरकाने विजय मिळवत भारताची आघाडी २२-१५ अशी वाढवली. त्यानंतरच्या तीन श्रेणींमध्ये भारतीय खेळाडूंनी पूर्ण वर्चस्व राखत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीचे नियंत्रण राखत कझाकिस्तानच्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यात ६ पेक्षा कमी गुणांवर रोखून सहज विजय मिळवला.