Thursday, August 27, 2026

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा काउंटी चॅम्पियनशिप हंगाम संपल्यानंतर एल्गर क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा करणार आहे. जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात महत्त्वाची भूमिका बजावत जगातील विश्वासार्ह कसोटी सलामीवीरांमध्ये आपले स्थान निर्माण केले.

दक्षिण आफ्रिकेसाठी अशी राहिली कारकीर्द :

डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेकडून ८६ कसोटी सामने खेळताना ३५.९२च्या सरासरीने ५,३४७ धावा केल्या. त्याच्या नावावर १४ शतके आणि २३ अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १९९ धावा असून, २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने ही शानदार खेळी केली होती. एल्गरची फलंदाजी आक्रमक फटक्यांपेक्षा संयम, तंत्र आणि कठीण परिस्थितीत मोठी खेळी करण्यासाठी ओळखली जात होती. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून आठ एकदिवसीय सामनेही खेळले असून, त्यात १७.३३च्या सरासरीने १०४ धावा केल्या. (Dean Elgar Retirement)

२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा :

डीन एल्गरने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तब्बल १२ वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग राहिल्यानंतर त्याने २०२४च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Dean Elgar Retirement)

भारताविरुद्ध केपटाऊन येथे झालेली कसोटी त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय कसोटी ठरली. दुखापतीमुळे टेंबा बावुमाला मैदानाबाहेर जावे लागल्यानंतर एल्गरने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले. आपल्या शेवटच्या कसोटीत त्याने १८५ धावांची शानदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव राखून जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. (Dean Elgar Retirement)

काउंटी क्रिकेटमध्ये दुसरी इनिंग :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एल्गरने इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केली. कसोटी क्रिकेटचे मर्यादित वेळापत्रक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या कमी होत चाललेल्या संधी लक्षात घेऊन तो Essex संघात दाखल झाला. एसेक्समध्ये त्याने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. (Dean Elgar Retirement)

Essex कडूनही दमदार कामगिरी :

एल्गरने २०२४ मध्ये एसेक्सकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने हंगामात १,००० हून अधिक धावा करत क्लबचा ‘Batter of the Year’ पुरस्कार मिळवला. याशिवाय २०२४च्या टी२० ब्लास्टमध्येही त्याने ३००हून अधिक धावांचे योगदान दिले. (Dean Elgar Retirement)

यापूर्वी एल्गरने Somerset आणि Surrey या संघांकडूनही काउंटी क्रिकेट खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेतील तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा प्रदीर्घ अनुभव एसेक्सच्या ड्रेसिंग रूमसाठीही महत्त्वाचा ठरला. कठीण परिस्थितीत संयमी फलंदाजी, नेतृत्व आणि संघासाठी योगदान देण्याची वृत्ती यामुळे डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता काउंटी चॅम्पियनशिपचा सध्याचा हंगाम संपल्यानंतर त्याची व्यावसायिक क्रिकेट कारकीर्द अधिकृतपणे संपणार आहे. (Dean Elgar Retirement)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >