मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी शहरात तसेच अनेक ठिकाणी नियमितपणे वायू सर्वेक्षण करणे व प्रदूषकांची वास्तव स्थितीदर्शक पातळी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून पाच ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.भारत सरकारने (The Government of India) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत प्रदूषित शहरातील वायु प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रदूषित शहराचा कृती आराखडा मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रातील अधिक प्रदूषित असणाऱ्या १८ शहरांमध्ये (18 cities) मुंबई शहराचा देखील समावेश आहे. महानगरपालिकेचा कृती आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑक्टोबर २०१९ मध्ये मंजूर केलेला आहे. या कृती आराखड्यानुसार शहरातील वाहतूक व्यवस्था, दळणवळण, उद्योगधंदे इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रीत करुन शहरातील वायु प्रदूषण नियंत्रित करणे गरजेचे आहे.
मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?
Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदीर मारण्यासाठी विषारी गोळ्या ...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८ नोव्हेंबर २००९ च्या सूचनापत्रात एकूण १२ प्रदूषकांची हवेच्या दर्जाची राष्ट्रीय मानके निर्धारीत करण्यात आलेली आहेत. त्यानुसार वातावरणातील विविध प्रदुषित घटकांचे मापन होणे आवश्यक आहे सध्या मुंबईत एकूण २८ वायू सर्वेक्षण केंद्रे कार्यरत आहेत.प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नियमितपणे वायु सर्वेक्षण करणे व प्रदूषकांची वास्तव
स्थितीदर्शक पातळी नागरिकांना उपलब्ध करुन देणे अभिप्रेत आहे. त्यानुसार बहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत आणखी 0५ ठिकाणी वास्तव
स्थितीदर्शक सतत वातावरणीय वायु गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे निर्माण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध स्थानानुसार हवेच्या गुणवत्तेची वर्तमान स्थिती, वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बाबतची अचूक माहिती उपलब्ध करून देणे,हे आहे असे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Car Accident : भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा भीषण अपघात ; थोडक्यात बचावले
सांगली : भाजपमधील सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ(Sudhir Gadgil) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने आमदार सुधीर गाडगीळ यांना किरकोळ ...
या वायू सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील वाढत्या वायु प्रदूषण समस्येवर उपाययोजना शोधण्यास मदत होईल. तसेच प्रदूषणा संदर्भात योजना आखण्यास धोरण बनवताना माहिती उपलब्ध होईल. प्रदूषण नियंत्रणास सुलभता निर्माण करुन स्वच्छ व हरीत मुंबईचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मुंबईत सद्या असलेल्या वायु सर्वेक्षण केंद्रांचे क्षेत्र वगळून म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तथा बृहन्मुंबई महानगरपालिका व सफर मुंबई प्रकल्प यांच्या अखत्यारीतील वायु सर्वेक्षण केंद्रांच्या जागांवर होणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले. तीन वर्षांच्या हमी कालावधीसह तसेच पुढील पाच वर्षांच्या देखभालीसाठी तब्बल १७.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी इन्विया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
Malegaon : मध्यरात्री फार्महाऊसवर अघोरी पूजेचा थरार! ‘पैशांचा पाऊस’ पाडण्यासाठी गुप्त विधी?; पोलिसांचा छापा, ७ जण अटकेत
Malegaon : मालेगाव तालुक्यात अंधश्रद्धा आणि अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंगसे (Mungse) शिवारातील एका फार्महाऊसवर मध्यरात्री सुरू असलेल्या ...
कुठे उभारणार केंद्रे?
1) सी. डी. देशमुख उद्यान, मुलुंड (पूर्व).
2) प्रमोद महाजन पार्क, वावर उदचन केंद्र, वादर (पश्चिम).
3) आरे उद्यान छोटा काश्मिर, गोरेगाव (पूर्व).
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन मैदान, दहिसर (पूर्व).
5) महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय, खार (एच/पश्चिम).