नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. (India U19 Squad)
सेहवागच्या मुलाला पुन्हा संधी :
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो दिल्ली प्रीमियर लीग २०२६मध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळत असून, त्याच्या आक्रमक फलंदाजीची तुलना वडील वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली जात आहे. आर्यवीरने २०२४च्या कूचबिहार ट्रॉफीत मेघालयाविरुद्ध २९७ धावांची शानदार खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली होती. (India U19 Squad)
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
द्रविडच्या मुलालाही स्थान :
भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याचाही एकदिवसीय संघात समावेश आहे. यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या अन्वयने जुलैमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील संघाच्या श्रीलंका दौऱ्यात ८७ धावांची खेळी करत प्रभावित केले होते. मात्र, आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड या दोघांनाही बहुदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. (India U19 Squad)
भारताचा अंडर-19 एकदिवसीय संघ :
बहुदिवसीय सामन्यांसाठी संघ :
यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यादव, इशान ओम, अयान अक्रम, प्रणव सिंह, प्रणव अरविंद आणि अरविंद राव. (India U19 Squad)
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कोलंबोच्या सिन्हालेज ...
भारत U19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19 वेळापत्रक :
पहिली वनडे: १८ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता दुसरी वनडे: २१ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता तिसरी वनडे: २३ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता पहिला बहुदिवसीय सामना: २७ ते ३० सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९.३० वाजता दुसरा बहुदिवसीय सामना: ५ ते ८ ऑक्टोबर, अहमदाबाद बी ग्राउंड — सकाळी ९.३० वाजता (India U19 Squad)
सेहवाग आणि द्रविड यांच्या मुलांना मिळालेल्या संधीमुळे या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.




