Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील Steve Jobs Theaterमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात कंपनी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सादर करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, Appleचा बहुप्रतीक्षित पहिला फोल्डेबल iPhone देखील याच कार्यक्रमात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या वर्षीचा Apple Event आणखी खास ठरणार आहे. 1 सप्टेंबरपासून John Ternus Appleचे CEO म्हणून Tim Cook यांची जागा घेणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हा पहिला मोठा प्रोडक्ट लॉन्च असेल.
iPhone 18 Pro सीरिजमध्ये काय बदल?
iPhone 18 Pro आणि Pro Maxमध्ये मोठ्या डिझाइन बदलांऐवजी काही महत्त्वाचे अपग्रेड अपेक्षित आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये A20 Pro चिप आणि नवीन C2 मॉडेम मिळण्याची शक्यता आहे. Pro Maxमध्ये Variable Aperture कॅमेरा तसेच भविष्यातील Under-Display Face ID तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळू शकते. मात्र, यंदाच्या सप्टेंबर इव्हेंटमध्ये Standard iPhone 18 लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे. तो iPhone 18e आणि iPhone Air 2 सोबत 2027च्या पहिल्या सहामाहीत सादर केला जाऊ शकतो.
मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गुरुवारी ‘एक्स’वर भावनिक ...
पहिला Foldable iPhone ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू?
Appleचा पहिला फोल्डेबल iPhone हा या इव्हेंटमधील सर्वात मोठा आकर्षण ठरू शकतो. रिपोर्ट्सनुसार, हा बुक-स्टाइल फोल्डेबल डिझाइनमध्ये येऊ शकतो. त्यात सुमारे 7.8 इंचांचा अंतर्गत डिस्प्ले आणि 5.5 इंचांचा बाह्य डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
इनर डिस्प्लेवर Under-Display कॅमेरा, तर बाहेरील स्क्रीनवर Punch-Hole कॅमेरा मिळू शकतो. मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आणि Touch IDच्या पुनरागमनाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या फोल्डेबल iPhoneची किंमत सुमारे 2,000 डॉलरपासून सुरू होण्याचा अंदाज काही रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
Apple Watch आणि AirPods Proमध्येही अपग्रेड
iPhoneसोबत Appleच्या नवीन Apple Watch मॉडेल्सची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन AirPods Pro देखील सादर केले जाऊ शकतात. या इयरबड्समध्ये कॅमेरे आणि Appleच्या Visual Intelligence फीचर्सशी संबंधित नवीन तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, iPhone 18 Pro सीरिजपेक्षा Appleचा पहिला Foldable iPhoneच 9 सप्टेंबरच्या इव्हेंटचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरण्याची शक्यता आहे.






