Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती


पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही काळजी


मुंबई : गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील वालभट नदीवरील मलजल प्रक्रिया केंद्राच्या बांधकामासाठी आरे भास्कर रोडवरील मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु पावसाळ्यात हे काम बंद करून वाहतुकीसाठी तात्पुरती रस्ता बनवून दिला आहे. परंतु हा रस्ता बनवताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नसून केवळ वरवर माती टाकून त्यावर डांबरीकरण केले आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता खचला जावून भविष्यात अपघात होण्याची भीती स्थानिक नगरसेविकेने व्यक्त याला जबाबदार कोण असा सवाल केला. दरम्यान, शुक्रवारी या रस्त्यावर खड्डा पडल्याची बाब निदर्शनास आली.



मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनवणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करण्यात करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी गोकुळधाम परिसरातील आरे भास्कर रोडवरील मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम पावसाळ्यात थांबवतानाच हा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुस्थितीत करून देताना याची योग्यप्रकारे काळजी घेतलेली नाही. तिथेच असलेली माती १० ते १२ फुट खोल खड्डयांमध्ये टाकून त्याचे डांबरीकरण केले. मात्र, हा रस्ता योग्यप्रकारे बनवलेला नसून हा रस्ता केव्हाही खचला जावू शकतो. यावरुन अवजड वाहनेही जातात. त्यामुळे हा रस्ता खचला जावून एखादा दुघर्टना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल करत हा रस्ता कधी पुन्हा नव्याने बनवणार अशी विचारणा केली.



तसेच भाजपच्या राखी जाधव(Rakhi Jadhav) यांनी घाटकोपरमधील म्हाडाच्या वसाहतींमध्ये मलवाहिन्यांचे नेटवर्क हस्तांतरीत झाल्यानंतरही लोकांना त्रास सहन करावा लागत. घाटकोपर पंपिंग स्टेशन असूनही यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तर वर्सोवा भागांमध्ये कायमच सिवर लाईन तुंबण्याचे प्रकार घडत असतात. प्रत्येक दिवशी गाड्या मागवून सिवर लाईन साफ करून घ्यावी लागत. मलनि:सारण वाहिन्यांचे नेटवर्क हे आपल्या अधिकाऱ्यांना ज्ञात असताना आपण बाहेरच्या संस्थांचा सल्ला कसा काय घेतो. हे सल्लागार महापालिका चालवणार का सा सवाल यशोधर फणसे यांनी केला. तर सफेद पुल परिसरात विकासकोन मलवाहिनी फोडून टाकली असून यावर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे एआयच्या माध्यमातून भूमिगत जाणाऱ्या मलवाहिन्यांचे मॅपिंग करण्यात यावे अशी सूचना केली. आजही माटुंगा परिसरात मलवाहिनी नाही, ही दुर्देवी घटना असल्याचे सांगितले.तसेच शिवसेनेच्या अंजली नाईक यांनीही विभागातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांबाबत तक्रार मांडली. यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर(Abhijit Bangar) यांनी वालभट नदी सांडपाणी प्रकल्पांतर्गत मलवाहिनी टाकण्याच्या कामांमध्ये जर रस्त्याचे काम पावसाळ्यापुरते सुस्थितीत आणून देताना त्याची काळजी घेतली नसेल तर त्याची दखल घेतली जाईल, संबधित विभागाला याबाबत निर्देश देवून आवश्यक कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच सल्लागारांची सेवा ही जिथे विद्यमान नेटवर्क आहे, तिथे नाही तर गोराईसह अन्य भागांमध्ये या सल्लागारांची सेवा घेतली जाईल असे स्पष्ट केले.


नगरसेविका प्रिती सातम(Priti Satham)  यांनी गुरुवारी स्थायी समितीमध्ये ही भीती व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी या रस्त्यावर मोठा खड्डा पडून रस्ता खचला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर या रस्त्याचा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता