मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार आहेत. विराट आणि बुमराह हे दोघेही या दौऱ्यात पुनरागमन करणार आहेत. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये दौऱ्या बाबत उत्सुकता वाढली आहे. इंग्लंडनंतर जुलैमध्ये भारतीय संघ आणखी एक परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय संघाचे जुलै महिन्यात किती सामने आहेत ?
भारतीय संघाचे जुलै महिन्यातील वेळपत्रक
जुलै महिन्यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अत्यंत व्यस्त कार्यक्रम असून यादरम्यान संघ इंग्लंड (England) आणि झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) दौऱ्यावर जाणार आहे.भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एक जुलैपासून होणार आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीमध्ये भारत इंग्लंज विरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका (T-20 Series) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १ जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे, दुसरा सामना ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे, तिसरा सामना ७ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे, चौथा सामना ९ जुलै रोजी ब्रिस्टल येथे आणि पाचवा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथॅम्पटन येथे खेळवला जाईल.
मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहराची 'लाईफलाईन' (Lifeline) म्हणून ओळखली जाते. मात्र, विरार लोकल (Virar Local) मध्ये घडलेल्या मयंक लोहार (Mayank Lohar Murder Case) हत्याकांडाने संपूर्ण ...
टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे, दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफ येथे आणि तिसरा सामना १९ जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होईल.
राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री ...
इंग्लंड दौरा संपवून भारतीय संघ थेट झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होईल, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर होणार असून पहिला सामना २३ जुलैला, दुसरा २५ जुलैला आणि तिसरा सामना २६ जुलै रोजी खेळवला जाईल.






