Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट डेनाली हे ६,१९० मीटर उंचीचे शिखर यशस्वीपणे सर करून आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. १७ जून २०२६ रोजी त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. या यशामुळे जगातील सातही खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करण्याच्या 'सेव्हन समिट्स' मोहिमेत त्यांनी सहावे शिखर जिंकले आहे.


यापूर्वी संभाजी गुरव यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट एल्ब्रस, माउंट किलिमांजारो, माउंट कोसिउस्को आणि माउंट अकॉनकागुआ ही शिखरे सर केली आहेत. आता डेनाली जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात सहा सर्वोच्च शिखरांचा समावेश झाला असून, शेवटच्या शिखराची मोहीम बाकी आहे.



गेली १५ वर्षे मुंबई पोलिसात सेवा बजावत असतानाही त्यांनी गिर्यारोहणाची तयारी नियमित सुरू ठेवली. रोज सकाळी ५ ते ७ या वेळेत ते कठोर सराव करत होते. नोकरी आणि गिर्यारोहण या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या.


डेनाली सर करण्यासाठी त्यांनी यापूर्वी २०२३आणि २०२५ मध्ये प्रयत्न केले होते. मात्र खराब हवामानामुळे दोन्ही मोहिमा अपूर्ण राहिल्या. या अनुभवांचा अभ्यास करून त्यांनी २०२६ मध्ये नव्या नियोजनासह पुन्हा मोहीम हाती घेतली.



५ जून २०२६ रोजी तीन सदस्यीय पथकासह त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. बर्फवृष्टी, अतिशय कमी तापमान, कमी ऑक्सिजन आणि कठीण हवामानाचा सामना करत अखेर १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी डेनालीचे शिखर गाठले. शिखरावर भारतीय तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज फडकवून त्यांनी देशाचा आणि राज्याचा सन्मान वाढवला.


या यशानंतर संभाजी गुरव यांनी त्यांच्या आहार प्रशिक्षक सुजाता गुरव तसेच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. सातत्य, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता