Thursday, June 25, 2026

IND W VS BAN W : भारतीय महिला संघासाठी आज करो या मरो सामना; सामन्यात पराभव झाला तर वर्ल्ड कपमधून बाहेर !

IND W VS BAN W : भारतीय महिला संघासाठी आज करो या मरो सामना; सामन्यात पराभव झाला तर वर्ल्ड कपमधून बाहेर !

मुंबई : भारतीय महिला (Indian Womens Cricket ) संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून २०२६ च्या टी२० विश्वचषकाची जोरदार सुरुवात केली. त्यांनी या वर्षीच्या स्पर्धेत आपले तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कमी झाल्या आहेत. परिणामी, बांगलादेशविरुद्धचा आजचा सामना (२५ जून) अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना तुलनेने सोपा असला तरी, भारतापुढील मुख्य आव्हान २८ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना असेल. ऑस्ट्रेलियन संघाने आजपर्यंत सहा वेळा टी२० विजेतेपद पटकावले आहे.

भारतीय संघाची टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील कामगिरी

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ६४ धावांनी परभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडसला ९५ धावांनी हरवत संघाने वर्ल्ड कप २०२६ मध्ये सलग दोन सामने जिंकले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचे आता दोन सामने राहिले आहेत. भारत चार गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे,तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सलग चार सामने जिंकले असून, त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

भारताचे पुढचे दोन सामने बांगलादेश (Bangladesh) आणि ऑस्ट्रेलिय (Australia) विरुद्ध होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संधी भारतापेक्षा अधिक आहेत कारण त्यांचे उरलेले दोन सामने कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघांविरुद्ध नेदरलँड्स आणि बांगलादेश आहेत. आफ्रिकन संघ या दोन्ही सामन्यांत विजयासाठी प्रबळ दावेदार म्हणून उतरेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागल्यास त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.

भारतीय खेळाडूंची कामगिरी

भारतीय संघासाठी स्मृती मंधनाने तीन सामन्यात सर्वाधिक १५९ धावा केल्या आहेत. तर दीप्ती शर्माने तीन सामन्यात सर्वाधिक दहा विकेट्स आहेत.

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, श्री चराणी, श्रेयांका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >