Tuesday, August 4, 2026

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त स्वभावामुळेही कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अर्शदीपच्या अनेक पोस्ट आणि रील्स याआधीही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता मात्र एका पॉडकास्टमधील वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतातील आपल्या आवडत्या टॉप-5 गोलंदाजांची यादी जाहीर करताना त्याने दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनची (R. Ashwin) जाहीरपणे माफी मागितली, त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले.

‘एश भाई, सॉरी... तुम्हाला वैयक्तिक मेसेज करेन’ :

एका पॉडकास्टमध्ये अर्शदीपला (Arshdeep Singh) भारतातील सर्वकालीन आवडते पाच गोलंदाज निवडण्यास सांगण्यात आले. यावेळी त्याने (Bhuvneshwar Kumar) भुवनेश्वर कुमार, (Mohhamad Shami ) मोहम्मद शमी, (Kuldeep Yadav) कुलदीप यादव, (Yuzvendra Chahal) युझवेंद्र चहल आणि (R. Ashwin) आर. अश्विन यांचा समावेश केला. मात्र, अश्विनला पाचव्या स्थानावर ठेवताना त्याने हसत माफी मागितली.

अर्शदीप (Arshdeep Singh) म्हणाला, "मला एश भाईला शेवटच्या स्थानावर ठेवायचं नव्हतं. पण बाकीची जागा आधीच भरली होती, त्यामुळे त्यांना पाचव्या क्रमांकावर ठेवावं लागलं. ते महान क्रिकेटपटू आहेत आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना ते माझे पहिले कर्णधार होते. सॉरी एश भाई... मी तुम्हाला वैयक्तिक मेसेज करूनही माफी मागेन."

भुवनेश्वर कुमार पहिल्या क्रमांकावर :

अर्शदीपने (Arshdeep Singh) आपल्या यादीत भुवनेश्वर कुमारला अव्वल स्थान दिले. त्यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, "भुवी भाई माझे वैयक्तिक आवडते गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी पाहून मी खूप काही शिकलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते नेहमीच नंबर वन असतील." यानंतर त्याने मोहम्मद शमीला दुसरे स्थान देत, कोणत्याही खेळपट्टीवर सीम गोलंदाजी करून फलंदाजांना अडचणीत टाकण्याच्या त्यांच्या क्षमतेचे कौतुक केले.

कुलदीप आणि चहललाही मानाचे स्थान :

यादीत कुलदीप यादवला तिसरे स्थान देताना अर्शदीपने त्याच्या 'चायनामन' फिरकीची आणि सामन्याचे चित्र बदलण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. तर युझवेंद्र चहलला चौथ्या क्रमांकावर ठेवत त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. अर्शदीपची (Arshdeep Singh) ही यादी आणि अश्विनची माफी मागण्याची शैली सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून, अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि विनोदी स्वभावाचे कौतुक केले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Arshdeep Singh (@_arshdeep.singh__)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >