दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी (Akhilesh Reddy) याच्यावर मॅच फिक्सिंगप्रकरणी (match-fixing) तब्बल 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने रेड्डीला भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या तीन कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. हे प्रकरण २०२५ मधील अबूधाबी टी१० स्पर्धेशी संबंधित आहे. (Akhilesh Reddy)
आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश रेड्डीवरील (Akhilesh Reddy) बंदी २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू मानण्यात आली आहे. त्यादिवशी त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. आता पुढील आठ वर्षे तो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी संबंधित उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.
नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी ...
नेमके आरोप काय आहेत?
आयसीसीच्या अहवालानुसार, अखिलेश रेड्डीने (Akhilesh Reddy) भ्रष्टाचारविरोधी संहितेतील कलम २.१.१, २.१.४ आणि २.४.७ चे उल्लंघन केले आहे. त्याच्यावर सामन्याचा निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे, फिक्सिंगच्या कटात सहभागी होणे, इतर खेळाडूंना पैशांचे आमिष दाखवून सामन्यावर परिणाम करण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच तपास दिशाभूल करण्यासाठी मोबाईलमधील चॅट्स, संदेश आणि महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचे गंभीर आरोप आहेत.
या स्पर्धेसाठी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आयसीसीचा भ्रष्टाचारविरोधी अधिकारी नियुक्त केला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायाधिकरणाने रेड्डीला (Akhilesh Reddy) दोषी ठरवले.
Commonwealth Games 2026 : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यात 2030 मध्ये होणाऱ्या ...
अल्पावधीतच कारकीर्दीला लागला ब्रेक :
अखिलेश रेड्डीने (Akhilesh Reddy) एप्रिल २०२५ मध्ये नॉर्थ अमेरिका टी२० कप स्पर्धेत केमन आयलंड्स विरुद्ध अमेरिकेच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते. त्याने एकूण ४ टी-२० सामने खेळले असून गोलंदाज म्हणून एक विकेट घेतली होती. त्याला अद्याप फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. यानंतर तो अबूधाबी टी१० लीगमधील 'एस्पिन स्टॅलियन्स' संघाचा सदस्य होता. मात्र, याच स्पर्धेदरम्यान समोर आलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे.
आयसीसीने (ICC) पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा दिली जाणार नाही आणि दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई सुरूच राहील.




