Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण मराठवाडा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत आणखी काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २४ जूनसाठी ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कोकणात २४ तासांत तीव्र पावसाची शक्यता


कोणकणातील काही भागात पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. पालघरसह काही जिल्ह्यांना वि‍जांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वि‍जांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर रत्नागिरीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रातही मान्सूनची हजेरी ?


पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सह सातारमध्ये कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.



मराठवाड्यात मान्सूनचे आगमन


मराठवाड्यातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. तर अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे



उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ?


धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.विदर्भात 23 जून रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी उष्णतेची लाट कायम आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत हिट वेव्हचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यातील पुढच्या काही तासात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पुढील ७२ तास महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर राहील.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून