Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार कोकण-गोवा पट्ट्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.



पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसर तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान खात्याने सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत सोमवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची तसेच हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश से. तर किमान तापमान २६ अंश से. राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



सोमवारी २४ ऑगस्ट २०२६ रोजी कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुण्यात २४ ऑगस्ट २०२६ रोजी आकाश ढगाळ राहण्याची आणि अतिशय कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून