Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता


मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा (Ammunition), स्फोटके, संरक्षण साहित्य (Defense materials), सौरऊर्जा प्रकल्प या तीन उद्योगांसाठी मंजूर करण्यात आली आहे. शेती महामंडळाची ही जमीन या उद्योगांना देण्यास महसूल विभागाने मंगळवारी मान्यता दिली.



दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला (Defence Research and Development Organisation) १ हजार ५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १ हजार ५०० एकर अशी ४ हजार २०० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. बैठकीला शिक्षणमंत्री दादा भुसे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थित होत्या.





या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (On lease) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे. या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २ हजार ३०० एकर आणि अन्य १ हजार ६०० एकर अशी एकूण ३ हजार ९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे उपसमितीने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून