Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण महिन्याचा अंदाजानुसार पाऊस नसेल. त्यामुळे ३० जूनपर्यंतचा अंदाज भरुन निघणार नाही, जुलैमध्ये अपेक्षित पडतो की किती यावर सर्व अवलंबून आहे. जुलैमध्ये किती पडतो यावर अवलंबून आहे. सध्या साडेआठ टक्के पाणी साठा असून हा साठा २० ऑगस्टपर्यंत टिकेल. तसेच पुढील परिस्थिती पाहून तलाव क्षेत्रात कृत्रित पाऊस पाऊस पाडण्याचा विचार केला जाईल. पण तुर्तास याबाबत कोणताही विचार नाही असे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. दरम्याने रेनवॉटर हार्वेस्टींग संदर्भात सर्व इमारतींचे ऑडीट करण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आश्वासन दिले.



मुंबईत सध्या १५ मे पासून १० टक्के कपात करण्यात आली आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने काही भागांमध्ये समस्याचा सामना करावा लागतो. मुंबईला ४६०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून येत्या,४००० प्रतीदिन पुरवठा केला जात आहे. तर कधीतरी ४१०० दशलक्ष केला जातो. त्यामुळे ५०० ते ६०० दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. दहा टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याने या कपातीचा परिणाम पातळीवर होतो. पाण्याचा दाब कमी झाला आहे. त्याचा परिणाम टोकावरील वस्त्यांमध्ये किंवा इमारती व चाळींना होत आहे. भूमिगत टाक्या नाही त्यांना होता, नागरिकांना यामुळे असुविधेचा सामना करावा लागतो.



टँकर उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असून महापालिका खासगी टँकर भाड़याने घेण्यात येत आहे. सध्या ज्याठिकाणी १० टक्के पेक्षा कमी कपात असेल तर त्या ठिकाणी मागणी असेल तर तिथे टँकर पुरवला जाईल. तसेच मुंबईतील महापालिकेच्या सर्व जलभरणा केंद्रांमध्ये वन टाईम ओटीपी दिला जाईल आणि त्यांना एकदाच टँकर भरता येईल अशाप्रकारे धोरण बनवले जात आहे. त्यानुसार लवकरच निर्णय गटनेत्यांच्या मान्यतेने घेवू. विहिरी पुनर्भरण कार्यक्रम सुरु करावा. त्यासाठी बजेट दिले आहे, त्या वॉर्डकडून विहिरी निश्चित करुन त्यानुसार कार्यक्रम सुरु ठेवला जाईल असे बांगर यांनी स्पष्ट केले.



मुंबईत पाणी गळती व चोरीची समस्या ही नसून दरवर्षी गळती कमी करण्यासाठी १ टक्के जलवाहिनी बदलण्याचा प्रयत्न करत असतो. पाणी चोरीची माहिती लोकप्रतिनिधी देतात असे नव्हे तर पाणी चोरी पकडून देतात. दंड नको तर गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी असते. याचे काही परिणाम दिसून येत नाही. यामध्ये पाणी चोरी व्यापकपणे राहील्याने त्यातून पाण्याचे नुकसान होते तसेच महसूल मिळत नाही, त्यामुळे त्यांना नियमित जोडणी दिल्यास त्यावर अंकूश लावू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी