BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील महापालिकेने मंजूर केलेल्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याने याची दखल आता प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी करणे तसेच झाडांना इजा पोहोचणे आदी प्रकारांची गंभीर दखल घेत महापालिकेच्यावतीने गुन्हा दाखल करण्याचे पाऊल उचलण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील दोन गृहनिर्माण सोसायटी विरोधात अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.



मुंबईतील वृक्ष हे महानगराच्‍या पर्यावरणीय समतोलाचे महत्त्वाचे घटक आहेत. वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करून वृक्षांना इजा पोहोचविणाऱ्या किंवा परवानगीच्या अटींचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.


मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ डीजीएम शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी आहे. या हाऊसिंग सोसायटीसमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाईन तक्रार पी उत्तर विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्‍या अधिका-यांनी तक्रारदार समवेत संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत सुमारे २० ते २२ छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले. तसेच, हाऊसिंग सोसायटीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. हाऊसिंग सोसायटीने झाडांना हानी पोहोचविल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाल्याने, संबंधितांविरुद्ध महानगरपालिकेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ सह कलम २१ अन्वये कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड गृहसंकुलात १०० हून अधिक झाडांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याची तक्रार एन विभागाकडे प्राप्‍त झाली. तक्रारीच्‍या अनुषंगाने संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्‍यात आली. वृक्षांच्या छाटणीसाठी महानगरपालिकेकडून विशिष्ट अटी व मर्यादांसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत मंजूर परवानगीच्या कक्षेबाहेर जाऊन अधिक प्रमाणात छाटणी करण्यात आल्याचे आढळून आले. कोणत्याही वृक्षाची तोड, इजा किंवा छाटणी करण्यापूर्वी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे तसेच मंजूर अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था अथवा विकासकाविरुद्ध कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूद आहे. त्‍यानुसार, कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संस्थेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्‍हणाले की, कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये अथवा इंजेक्शन देणे, झाडे तोडणे किंवा नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी