Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला


नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 31 दशलक्ष डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. लोकांमध्ये या ॲपचा वाढता वापर हे दर्शवतो की सेवा सहज उपलब्ध करून देण्याबाबत या ॲपबद्दलची विश्वासार्हता वाढीस लागत आहे.


जीवनमान सुलभ करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आधार ॲपमुळे लोकांना आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, आपला पत्ता अद्ययावत करणे इत्यादी गोष्टी त्यांच्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज करता येऊ लागल्या आहेत.



आतापर्यंत 4 दशलक्ष लोकांनी नवीन आधार ॲपद्वारे आपले मोबाईल क्रमांक अद्ययावत केले आहेत. त्याचवेळी सुमारे 850,000 लोकांनी या ॲपद्वारे आपला पत्ता अद्ययावत केला आहे. आधार ॲप, आधार धारकांना त्यांची ओळख सोबत बाळगण्यासाठी, दाखवण्यासाठी, कुणाला पाठवण्यासाठी आणि ती सत्यापित करण्यासाठी एक सुरक्षित, सोयीस्कर आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारा मार्ग प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.



या ॲपमध्ये नागरिकाभिमुख अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये एका क्लिकवर बायोमेट्रिक लॉक/अनलॉक, उपस्थितीच्या पडताळणीसाठी ‘फेस व्हेरिफिकेशन’ (चेहरा पडताळणी), प्रमाणीकरणाचा इतिहास तसेच पारंपरिक छापील व्हिजिटिंग कार्डऐवजी संपर्क तपशील सहजपणे शेअर करण्यासाठी क्यूआर-आधारित संपादनयोग्य संपर्क कार्ड यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत.



वापरण्यास अत्यंत सुलभ असलेले आधार ॲप दैनंदिन जीवनातील अनेक गरजांसाठी उपयुक्त ठरत आहे. यामध्ये ऑफलाइन व्हेरिफिकेशन सिकींग एंटिटी (OVSE) च्या QR कोडचे स्कॅनिंग करून हॉटेलमध्ये चेक-इन करणे याचा समावेश आहे. तसेच रुग्णालयात प्रवेश घेणे, अभ्यागतांचे व्यवस्थापन, कार्यक्रमांमधील प्रवेश, गिग वर्कर्स आणि सेवा भागीदारांची ओळख पडताळणे अशा अनेक वापरांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज