Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या बीकानेर, दिल्ली, लखनऊ, पाटणा मार्गे मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून सुमारे ०.९ किलोमीटर उंचीवर असल्याने राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


मंगळवारी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारीही विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.


दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजता जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील.


आज मुंबईत दुपारी ३:१७ वाजता ४.११ मीटरची भरती, तर रात्री ९:२५ वाजता १.०६ मीटरची ओहोटी असेल. बुधवारी पहाटे ४:०९ वाजता भरती आणि सकाळी ९:३३ वाजता ओहोटीची नोंद होईल.


गेल्या २४ तासांत (३ ऑगस्ट सकाळी ८ ते ४ ऑगस्ट सकाळी ८) मुंबई शहरात ३.०६ मिमी, पूर्व उपनगरात ६.३१ मिमी आणि पश्चिम उपनगरात ४.१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना, विशेषतः घाट परिसर आणि अतिवृष्टीच्या शक्यता असलेल्या भागांमध्ये, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील