Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर पोहोचला असून मागील वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक जमा झालेला आहे. आतापर्यंत या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा हा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी होता. आजवर मागे असलेला पाणी साठ्याने आता त्यांनाही मागे टाकत बाजी मारली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणीपातळी ही ९०.०६ टक्के एवढी झाली आहे. या सर्व धरणांमधील पाणी साठा आठ टक्यांवर जावून पोहोचला होता, त्यावेळी मागील वर्षीचा पाणीसाठा २५ टक्के होता. त्यामुळे कासवगतीने हा होईना मागील वर्षीच्या पुढे यंदाच्या पाणी साठ्याने बाजी मारल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Mumbai Water Supply)



महापालिकेच्या जलअभियंता विभागाने सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घेतलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरण तसेच तलावांमधील पाणी साठा १३ लाख०३ हजार ५०० दशलक्ष लिटर अर्थांत ९०.०६ टक्के होता. तर याच दिवशी मागील वर्षी म्हणजे सन २०२५मध्ये १२ लाख ८९ हजार ४५५ दशलक्ष लिटर अर्थांत ८९.०९ टक्के तसेच याच दिवशी सन २०२४मध्ये ११ लाख ८६ हजार १९७ अर्थात ८१.९६ टक्के एवढा पाणीसाठा हा वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत होता.


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी हे तलाव तथा धरणे आधीच ओसंडून वाहू लागली आहेत. तर अप्पर वैतरणा ८० टक्के, मध्य वैतरणा ९२.१५ टक्के भरली आहेत, तर मुंबईतील सर्वांधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणांतील पाणी पातळी ही ८८.४३ टक्के एवढी आहे. त्यामुळे मुंबईचा पाणी पुरवठा हा सध्या मर्यादेतच असून आॅगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाची रिझझिम झाली तरी उर्वरीत पाण्याचा साठा वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये जो पाऊस पडेल त्यातून दैनंदिन पाण्याची गरज आणि साठवण आदींचे गणित लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात वर्षभराची तहान भागवण्या इतपत पाणी साठा तयार होईल असा विश्वास आहे. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे महापालिका पाणीकपात मागे घेण्याची कोणताही धोका पत्करणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत कपात कायमच राहणार असल्याचेही प्रशासनाकडून स्ष्ट केले जात आहे.



३ ऑगस्टपर्यंतचा मागील तीन वर्षांचा पाणीसाठा माहिती


सन २०२६ : १३ लाख०३ हजार ५०० दशलक्ष लिटर (९०.०६ टक्के)


सन २०२५ : १२ लाख ८९ हजार ४५५ दशलक्ष लिटर (८९.०९ टक्के)


सन २०२४ : ११ लाख ८६ हजार १९७ दशलक्ष लिटर (८१.९६ टक्के)

Comments

विश्वास डिग्गीकर    August 8, 2026 06:54 AM

आता सर्व तलाव, धरणे शंभर टक्के भरावीत.

Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी