नाशिक : मुंबई नाका परिसरातील भाभानगर येथील एका ऑईल गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. (Nashik Fire)
आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवत नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवले. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग आजूबाजूच्या इमारती आणि परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. (Nashik Fire)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील खंबाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १३ दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीय जवानाचा ...
या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणावरील माल जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ऑईल साठवणुकीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. (Nashik Fire)
View this post on Instagram






