ठाणे : शहापूर-मुरबाड (Shahapur-Murbad) मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनी बस (Mini Bus Accident) चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते.
नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail), खंडणी (Extortion) आणि सक्तीने धर्मांतर ...
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मिनी बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून ते अलिबाग येथून नाशिककडे परतत होते. पहाटेच्या सुमारास बस शहापूर-मुरबाड मार्गावरील शेंद्रुण येथील धोकादायक वळणावर पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला खाली उतरून अपघातग्रस्त झाली.
या अपघातात बस चालक प्रभाकर गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातात अश्विनी आकाश काळे (वय २७), पल्लवी वाल्मीक काठावटिक (वय २८) आणि कैलास हेमंत गायकवाड (वय २२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील विकासकामे मात्र दिरंगाईने सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आता मनपा आक्रमक झाली ...
या अपघातामुळे काही काळ शहापूर-मुरबाड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत चालकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






