रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे. पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावर असून, या छळाला कंटाळून महिलेने आपल्या चार मुलांना विषारी औषध कोल्ड्रिंकमध्ये मिसळून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून महिलेनेही विषारी पेय प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेलवाहिनी पिगिंगचे ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ ते १३ जून २०२६ या कालावधीत आरोपीने खरवली आदिवासीवाडी येथील आपल्या पत्नीला वारंवार शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. या त्रासाला वैतागून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विषारी औषध मिसळलेले कोल्ड्रिंक आपल्या चार मुलांना पाजल्यानंतर तिने स्वतःही ते प्राशन केले. उपचारादरम्यान दोन मुली व महिलेचा मृत्यू झाला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), १०९(१), १२३, १०८, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपीला १४ जून २०२६ रोजी पहाटे अटक करण्यात आली. या गंभीर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.






