Tuesday, June 9, 2026

Lalbaug cha Raja Padya Pujan 2026 : लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा संपन्न; गणेशोत्सवाच्या तयारीला शुभारंभ

Lalbaug cha Raja Padya Pujan 2026 : लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा संपन्न; गणेशोत्सवाच्या तयारीला शुभारंभ

मुंबई : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाची अधिकृत नांदी आज म्हणजेच मंगळवार ९ जून रोजी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याने झाली. चाफ्याच्या सुगंधी फुलांवर साकारलेल्या गणरायाच्या पावलांच्या प्रतिकात्मक पूजनाने लालबागच्या राजाच्या २०२६ सालच्या मूर्ती निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला. (Lalbaug cha Raja Padya Pujan 2026)

जगभरातील कोट्यवधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विधिवत पाऊल पूजन पहाटे लालबागचा राजा मार्ग येथील हनुमान मंदिरात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता हा मंगल सोहळा संपन्न झाला. (Lalbaug cha Raja Padya Pujan 2026)

९३ व्या वर्षातील गणेशोत्सवाची सुरुवात :

यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ९३ व्या वर्षातील गणेशोत्सवाचे मुहूर्त पूजन मोठ्या भक्तिभावाने पार पडले. यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन करण्यात आले. मुहूर्त पूजनानंतर आता प्रसिद्ध मूर्तीकार कांबळी बंधू यांच्या हस्ते लालबागच्या राजाच्या मूर्ती घडविण्याच्या कार्याला अधिकृत सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. (Lalbaug cha Raja Padya Pujan 2026)

१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाचा महासोहळा :

यावर्षी लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीपासून सुरू होणार असून शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जनाने त्याची सांगता होणार आहे. गणेशोत्सवाच्या या ११ दिवसांच्या कालावधीत लाखो नव्हे तर कोट्यवधी भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होतात. देश-विदेशातील भक्तांसाठी हा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा केंद्रबिंदू ठरतो. (Lalbaug cha Raja Padya Pujan 2026)

‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ख्याती :

लालबागचा राजा हा केवळ मुंबईचाच नव्हे तर संपूर्ण जगातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. "नवसाला पावणारा गणपती" अशी ओळख असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मुहूर्त पूजनाचा सोहळा पार पडताच आता गणेशोत्सवाचे नगारे वाजू लागले असून, लालबागच्या राजाच्या आगमनाची उत्सुकता भक्तांमध्ये शिगेला पोहोचली आहे. चाफ्याच्या फुलांवर उमटलेल्या त्या मंगल पावलांनी यंदाच्या गणेशोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. (Lalbaug cha Raja Padya Pujan 2026)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >