Monday, June 8, 2026

Devendra Fadnavis : पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा तिढा अखेर सुटला; "हा महादेव भक्तांचा विजय!" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा तिढा अखेर सुटला;
ठाणे : "महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ही सर्व जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी  उद्योगमंत्री डॉ उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल,पिंपळेश्वर मंदिराचे विश्वस्त (ट्रस्टी) आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (Devendra Fadnavis)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधीवत महापूजा करण्यात आली. यावेळी भक्त मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले आहे. मात्र, आम्ही सर्व जण केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. त्यामुळे या यश प्राप्तीचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते. हे पुण्यकर्म करण्याची संधी महादेवाने आम्हास दिली. आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेतले. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, तोच सुवर्ण इतिहास पिंपळेश्वर महादेवाला पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन या ठिकाणी करणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >