Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि मस्तवाल अधिकारी' असे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात तासनतास वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत जाब विचारणाऱ्या नागरिकांना महावितरणाचे अधिकारी दाद देत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरण प्रशासनाची ही मुजोरी आता चाळीसगावकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे.

नेमका प्रकार काय ?


भर उन्हात आणि ऐन कामाच्या वेळी वीज गायब होणे आता नित्याचेच झाले आहे. "लाईट का गेली?" आणि "ती कधी येईल?" असे साधे प्रश्न विचारण्यासाठी नागरिक जेव्हा महावितरण कार्यालयात जातात किंवा फोन करतात, तेव्हा त्यांना उद्धट उत्तरे दिली जातात किंवा चक्क टाळाटाळ केली जाते. तक्रार निवारण केंद्रावर फोन उचलला जात नाही आणि कार्यालयात गेल्यास अधिकारी आपल्या खुर्चीचा माज दाखवत जनतेला ताटकळत ठेवतात.’

भीक नको, पण कुत्रं आवर’


अशी स्थितीशहरातील अनेक भागांत तासोतास वीज नसल्याने उद्योगधंदे ठप्प झाले आहेत, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचेही नुकसान होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उपकरणांचेही नुकसान होत आहे. तक्रार करायला गेलेल्या नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने, "महावितरणाकडून सवलत नको, पण किमान वीज तरी नीट द्या" म्हणजेच "भीक नको पण कुत्रं आवर" अशी म्हणण्याची वेळ आता त्रस्त चाळीसगावकरांवर आली आहे.


प्रशासकीय ढिम्मपणाचा कळस


एकीकडे सरकार दर्जेदार वीज पुरवठ्याचा दावा करत असताना, चाळीसगाव महावितरण मात्र या दाव्याला हरताळ फासत आहे. वीज देयके वसुलीसाठी तत्पर असणारे हे विभाग सेवा देताना मात्र पूर्णपणे 'ढिंब' झाले आहेत. या मग्रूर अधिकाऱ्यांना वरिष्ठांचा वचक उरला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर लवकरच यात सुधारणा झाली नाही, तर संतप्त नागरिक महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

ना लोकप्रतिनिधींचा धाक, ना वरिष्ठांचा वचक; महावितरणचे अधिकारी बेकाबू!


चाळीसगाव महावितरणमधील सध्याची अनागोंदी पाहता, येथे ‘राजा उतावीळ आणि प्रधान प्रधानाचा’ अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. या मस्तवाल अधिकाऱ्यांवर ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा वचक राहिला आहे, ना वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश! सामान्य जनता उन्हातान्हात विजेविना तडफडत असताना, लोकप्रतिनिधींनी यावर कायमची चपराक का लगावली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.बिल वसुलीच्या नावाखाली सर्वसामान्यांची वीज तत्परतेने कापणारे हे अधिकारी स्वतःच्या कर्तव्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादामुळेच या अधिकाऱ्यांची मग्रुरी वाढली आहे का, अशी शंका घेण्यास आता वाव आहे. लोकप्रतिनिधींनी जर या बेकाबू झालेल्या अधिकाऱ्यांचे लगाम तात्काळ ओढले नाहीत, तर महावितरणच्या या उफराट्या कारभाराचा फटका आगामी काळात येथील राजकारण्यांनाही बसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की!


नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया


“आम्ही वीज बिल वेळेवर भरतो, मग आम्हाला ही नरकयातना का? महावितरण कार्यालयात फोन केला तर कोणी उचलत नाही आणि गेल्यास अधिकारी सरळ तोंड बघायला तयार नाहीत. या अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे आमचा संयम सुटत चालला आहे. यांना कोणाचाही धाक उरलेला नाही का?”

-प्रमोद पाटील, त्रस्त नागरिक, चाळीसगाव.

“दिवसभरात १० वेळा लाईट जाते. तासोतास वीज नसल्याने घरची कामे आणि व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत. महावितरणचे अधिकारी एसी कॅबिनमध्ये बसून मजा मारतात आणि जनतेला उन्हात सडवतात. ही कसली सेवा? यांच्या मनमानी कारभाराचा आता पंचनामा करण्याची वेळ आली आहे.”

- श्रीमती सुनिता देशमुख, गृहिणी, चाळीसगाव.
Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत