Nashik News : नाशिकचा आणखी एक भामटा ज्योतिषी समोर, ‘ज्योतिषा’चे थेट दुबई कनेक्शन ?

Nashik News : नाशिक पोलिसांच्या रडारवर सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सचिन देशमुख! स्वतःला ज्योतिषी म्हणवणारा, हनुमान भक्त असल्याचा दावा करणारा हा व्यक्ती आता एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे पोलिसांना हवा आहे. कारण, श्रद्धा आणि भविष्याच्या नावाखाली त्याने शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप आहे. (Nashik Crime News)




नाशिकमध्ये अंजनीय ज्योतिष नावाने कार्यालय


नाशिकमधील शरणपूर रोड (Sharanpur Road) परिसरात ‘अंजनीय ज्योतिष’ नावाने कार्यालय चालवणाऱ्या सचिन देशमुखने (Sachin Deshmukh) लोकांचा विश्वास जिंकला. भविष्य सांगण्याच्या माध्यमातून त्याने अनेकांना शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं. विश्वास इतका बसला की तब्बल 321 जणांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्याच्या माध्यमातून केली.


ही रक्कम काही लाखांत नव्हती तर ती थेट 36 कोटी 32 लाख रुपये होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवलीच गेली नाही. उलट हा पैसा हडप करण्यात आल्याचं सायबर पोलिसांच्या (Cyber ​​police) तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाचा पहिला संशय एका किराणा दुकानदाराला आला. देशमुखने त्यालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संशय आल्यावर दुकानदाराने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) धाव घेतली आणि त्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.




सचिन देशमुख विरोधात लूकआऊट नोटीस


धक्कादायक म्हणजे, तक्रारींचा आकडा वाढतच गेला. आतापर्यंत 329 जणांच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असून, फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, पैसे घेऊन सचिन देशमुख फरार झाला असून तो दुबईत लपल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस (Lookout notice) जारी करण्यात आली असून सायबर पोलीस त्याच्या मागावर आहेत.


श्रद्धा, ज्योतिष आणि मोठ्या नफ्याचं आमिष या तिन्ही गोष्टींचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी