नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य इव्हेंटमध्ये 'हेल इन अ सेल'मध्ये ओबा फेमीकडून पराभव पत्करल्यानंतर काही तासांनी त्याने निवृत्तीची घोषणा केली.
रेसलमेनिया ४२ आणि क्लॅश इन इटली येथील लढतींनंतर लेसनर आणि फेमी यांच्यात समरस्लॅमच्या मुख्य इव्हेंटमध्ये 'हेल इन अ सेल'मध्ये तिसऱ्यांदा सामना रंगला. रेसलमेनियानंतर आपले ग्लोव्हज आणि बूट रिंगमध्येच सोडून ब्रॉक लेसनरने निवृत्तीचे संकेत दिले होते. आता 'हेल इन अ सेल'मध्ये ओबा फेमीकडून पराभव पत्करल्यानंतर काही तासांनी ब्रॉक लेसनरने अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केली आहे.
लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन डायमंड लीग ('ॲथलेटिसिमा') स्पर्धेत सहभागी ...
आता मी भूतकाळ झालो आहे. ओबा फेमी या खेळाचे भविष्य आहे, असे सांगत ४९ वर्षीय ब्रॉक लेसनरने निवृत्तीविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शनिवारी हरल्यानंतर ब्रॉक लेसनर भावूक झाला होता. या अवस्थेतच त्याने दोन दिवस घालवले आणि अखेर मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. शेतकरी ते रेसलर (कुस्तीपटू) असा अविस्मरणीय प्रवास माझ्यासाठी खूप आनंददायी आहे पण वयाचे भान ठेवून निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचे ब्रॉक लेसनरने सांगितले. आतापर्यंतच्या यशासाठी त्याने देवाचे आभार मानले आणि त्याला प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले.
दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी (Akhilesh Reddy) ...
'मला माझ्या सर्व प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत, आणि विशेषतः लहान मुलांना सांगायचं आहे की — मी फक्त खिशात कापसाचे धागे घेऊन फिरणारा एक शेतकरी मुलगा होतो, आणि माझी स्वप्नं मोठी होती, आणि मी फक्त मेहनत करत राहिलो. आजकाल बरेच लोक खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करतात, पण त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात. जर मुलांनी फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यासाठी वेळ दिला, तर चांगल्या गोष्टी घडतील'; असेही ब्रॉक लेसनर म्हणाला.
नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी ...
ब्रॉक लेसनरने २००२ मध्ये WWE मध्ये पदार्पण केले. त्याने WWE आणि युनिव्हर्सल टायटल्स मिळून दहा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्या. विशेष म्हणजे २५ व्या वर्षीच समरस्लॅम २००२ मध्ये ब्रॉक लेसनरने विजय मिळवला. द रॉकला हरवत तो सर्वात लहान वयाचा WWE चॅम्पियन झाला. एका दशकाहून अधिक काळानंतर, त्याने रेसलमेनिया ३० मध्ये द अंडरटेकरची रेसलमेनियामधील अपराजित मालिका संपुष्टात आणून कुस्तीच्या इतिहासात आपले नाव कोरले. आता ४९ व्या वर्षी समरस्लॅमच्या मुख्य इव्हेंटमध्ये 'हेल इन अ सेल'मध्ये ओबा फेमीकडून पराभव पत्करल्यानंतर आपली वेळ संपल्याचे जाहीर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली.