मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली'
मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेल्या माघारीनंतर कोकणची जागा महायुतीने बिनविरोध राखली. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि पडद्यामागील रणनीतीवर मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "कोकणच्या या राजकीय चित्रपटाचे खरे डायरेक्टर 'देवभाऊ' म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्या अचूक रणनीतीमुळेच महायुतीला हे यश मिळाले असून, पक्षनेतृत्वाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी केवळ एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून चोखपणे पार पाडली आहे," असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
डहाणू : अंधश्रद्धेच्या विळख्यातून डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथे घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे. करणी केल्याच्या संशयातून शेजारी ...
बाळ माने यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीला (मविआ) कोकणात मोठा धक्का बसला असून, या विजयाचे सर्व श्रेय नितेश राणे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. "या प्रक्रियेत माझे वैयक्तिक असे फार योगदान नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात वरिष्ठ पातळीवर या जागेसंदर्भात निर्णय झाला होता. महायुतीचा आणि देवेंद्रजींचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे फक्त पुढाकार घेतला. वरिष्ठ नेत्यांनी चित्रपटाची जी आखणी करून दिली होती, कोणी कुठे जावे आणि काय करावे हे आधीच ठरवले होते, आम्ही फक्त त्याची मैदानावर अंमलबजावणी केली," असे राणे म्हणाले.
मुंबई : पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि ‘मॉन्सून’वर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तटस्थ’ ...
उबाठा गटाकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. "कोकण विधानपरिषद निवडणुकीत उबाठा गटाकडे अवघी ५५ मते होती. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः उभा केलेल्या उमेदवाराला तुमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त विश्वास वाटतो, यात चूक कोणाची? बाळ माने यांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, हे तुमचेच मोठे अपयश आहे," असा घणाघात त्यांनी केला. महायुतीचे वरिष्ठ नेते राज्यातील सर्व १७ जागांवर स्वतः पोहोचू शकत नसल्याने वेगवेगळ्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. नाशिकमध्ये उदय सामंत आणि दादा भुसे काम पाहत आहेत, तर काही भागांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
नवे चंदीगड : इंडियन प्रीमियर लीगच्या धामधुमीनंतर आता भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या रंगमंचावर परतत आहे. ६ जूनपासून मुल्लानपूर येथील ...
संजय राऊतांनी आधी पुरावे द्यावेत



