Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि संबंधित सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तांत्रिक सल्लागार समितीने मंगळवारी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीस प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, युनिसेफचे आनंद घोडके, वॉश इन्स्टिट्यूटचे राजेश पाई, आयआयटी मुंबईचे डॉ. प्रदीप कल्बार तसेच जागतिक बँकेचे जे. व्ही. आर. मूर्ती उपस्थित होते.



स्वच्छता सुविधांचे प्रभावी नियोजन


स्वच्छता सुविधांचे नियोजन करताना शौचासनांच्या संख्येला प्राधान्य देण्याची शिफारस समितीने केली. घाट परिसरात पुरेशा प्रमाणात शौचालये उभारणे, विशेषतः पावसाळ्यात मूत्रालयांची संख्या वाढविणे, देखभाल आणि स्वच्छतेसाठी महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, पुरेशा हात धुण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सांडपाण्याची विल्हेवाट सोक पिट किंवा जवळील सांडपाणी वाहिनीमार्फत लावण्याबाबतही समितीने सूचना केल्या. स्वच्छता व्यवस्थेसाठी आवश्यक पाणी भरण्याची केंद्रे निश्चित करण्यावरही भर देण्यात आला. कचरापेट्यांमधील कचरा संकलनासाठी महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.



विद्युत वाहनांचा वापर करण्याची शिफारस


पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता व्यवस्थापनासाठी डिझेल आणि पेट्रोल वाहनांऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर दर तीन ते पाच किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही समितीने केली. महिला आणि मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (एमएचएम) उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम पूर्ण करण्यावर समितीने भर दिला. तसेच स्वच्छतेशी संबंधित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम राबविण्यासाठी विविध संस्थांच्या सहभागासह आतापासूनच तयारी सुरू करण्याची शिफारसही करण्यात आली.



बैठकीतील शिफारशींनुसार विभागनिहाय घनकचरा व्यवस्थापन आराखडा तयार करणे, स्वच्छता सुविधांची आवश्यकता निश्चित करणे, पाणी भरण्याच्या केंद्रांचे मॅपिंग करणे, स्वच्छता व्यवस्थापनासाठी विद्युत वाहनांच्या वापराचे नियोजन करणे, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाचा आराखडा तयार करणे, स्वच्छता कर्मचारी व कंत्राटदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, साधूग्राममधील स्वच्छता उपक्रमांसाठी युनिसेफशी समन्वय साधणे तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमासाठी विविध संस्थांशी चर्चा सुरू करणे आदी बाबींवर कुंभमेळा प्राधिकरण पुढील कार्यवाही करणार आहे.

Comments
Add Comment

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात,

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी