Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार भारतातील आघाडीच्या २५ सेलिब्रिटींच्या ब्रँडची एकूण किंमत २ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी नोंदवली गेली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.७ टक्क्यांनी कमी आहे. या यादीत १३ पुरुष आणि १२ महिला सेलिब्रिटींचा समावेश असून, त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सोशल मीडियावरील प्रभावाच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले आहे.


शाहरुख खान अव्वल स्थानी:




[caption id="attachment_1048955" align="aligncenter" width="337"] Shah Rukh khan[/caption]

यंदा बॉलीवूडचा 'किंग' शाहरुख खानने मोठी झेप घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. २०२४ च्या अहवालात तिसऱ्या स्थानावर असलेला शाहरुख खान आता भारतातील नंबर-१ ब्रँड बनला आहे. त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटामुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.


रणवीर सिंह दुसऱ्या स्थानावर :




[caption id="attachment_1048956" align="aligncenter" width="404"] Ranveer Singh[/caption]

या अहवालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अभिनेता रणवीर सिंहने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकले आहे. रणवीर सिंहने १६२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे. 'धुरंधर' फ्रँचायझीच्या आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या १००० कोटींच्या ऐतिहासिक यशानंतर रणवीरची ब्रँड व्हॅल्यू आणि डिजिटल प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.


विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर :




[caption id="attachment_1048959" align="aligncenter" width="401"] Virat Kohli[/caption]

गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला विराट कोहली यंदा १५८.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रणवीर सिंहच्या १६२.९ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत विराटची ब्रँड व्हॅल्यू कमी राहिल्याने रणवीरने त्याच्यावर मात केली आहे.


चित्रपटसृष्टीचा दबदबा :


पहिल्या दोन स्थानांवर अनुक्रमे शाहरुख खान आणि रणवीर सिंह असल्याने, भारतीय मनोरंजन विश्वातील या दोन सुपरस्टार्सचा केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर ब्रँड मार्केटमध्येही प्रचंड दबदबा असल्याचे या अहवालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत