जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक २०२६ मध्ये भारताने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. सुरुची सिंग आणि ईशा सिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकले. गेल्या हंगामात तीन वैयक्तिक आयएसएसएफ विश्वचषक सुवर्णपदके जिंकणाऱ्या सुरुची सिंगने अंतिम टप्प्यात शानदार कामगिरी करत २४२.१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.गेल्या वर्षी दोहा येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरीत जिंकलेल्या सुवर्णपदकासह, सुरुची सिंगचे हे सातवे आयएसएसएफ विश्वचषक पदक आहे.सुवर्णपदकामुळे या २० वर्षीय भारतीय नेमबाजाने डिसेंबरमध्ये इटलीतील रोम येथे होणाऱ्या या वर्षीच्या आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरीसाठी थेट पात्रता मिळवली आहे. (ISSF World Cup 2026 Suruchi, Isha Singh)
Sangamner Crime : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम आश्रमाचे चालक राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) बाबा याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, त्याच्या ...
भारताची मुस्कान पात्रता फेरीत ५७९-१६x गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली, परंतु ती केवळ रँकिंग गुणांवरच स्पर्धा करत होती. सुरुची आणि ईशा अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर ५७८ गुणांसह पात्र ठरल्या.दरम्यान, मनू भाकर ५७५-१७x गुणांसह २० व्या स्थानावर राहिली आणि म्युनिकमध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. ती आता १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात स्पर्धा करेल.दुसरी भारतीय नेमबाज, अंजली शेखावत, आरपीओ (RPO) अंतर्गत ५५९-११x गुणांसह ९३ व्या स्थानावर राहिली. (ISSF World Cup 2026 Suruchi, Isha Singh)
मुंबई : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 भारतातील ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज झी (ZEE) ...





