Mumbai : फ्रेंच ओपन २०२६ मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. 24 वेळा ग्रँडस्लॅम विजेता Novak Djokovic याचा तिसऱ्या फेरीत 19 वर्षीय ब्राझिलियन स्टार जोआओ फोन्सेक (Joao Fonseca) याने थरारक सामन्यात पराभव केला आहे. यामुळे क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. सुमारे पाच तास चाललेल्या या लढतीत फोन्सेकाने दोन सेट पिछाडीवरून दमदार पुनरागमन केले आणि जोकोविचला 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 अशा फरकाने पराभूत केले आहे. या विजयासह फोन्सेकाने टेनिसविश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सामन्यादरम्यान ३९ वर्षीय जोकोविच उष्णतेमुळे त्रस्त दिसत होते. अनेकदा त्यांना आईस पॅकचा वापर करावा लागला. एका क्षणी ते कॅमेरामनवरही संतापला आणि कॅमेरा मागे घेण्यास सांगितले. दोन सेट जिंकल्यानंतरही जोकोविचला विजय मिळवता आला नाही. चौथ्या सेटमध्ये पराभवाच्या उंबरठ्यावर असताना फोन्सेकाने जबरदस्त खेळ दाखवत सामना निर्णायक सेटपर्यंत नेला होता. अखेरीस सलग तीन ऐस मारत त्याने आपल्या करियरमधील सर्वात मोठा विजय साजरा केला. या विजयासह फोन्सेका ग्रँडस्लॅम स्पर्धेत जोकोविचला पराभूत करणारा पहिला तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच रोलँड गॅरोसमध्ये दोन सेट पिछाडीवरून जोकोविचला हरवणारा इतिहासातील दुसरा खेळाडू बनला आहे.
Con 39 años. Luego de 5 horas. Contra un chico 20 años menor. Dejó absolutamente todo lo que tenía y no le alcanzó, pero para nosotros eso no importa. Novak Djokovic DIGNIFICA el tenis.pic.twitter.com/MAcAwPYMnc
— Tiempo De Tenis (@Tiempodetenis1) May 29, 2026
सामन्यानंतर भावूक फोन्सेकाने सांगितले,
जोकोविच माझा आदर्श आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे आणि विजय मिळवणे हा माझ्या करियरमधील सर्वात खास क्षण आहे. टेनिसविश्वातील या मोठ्या धक्क्यामुळे फ्रेंच ओपनच्या विजेतेपदाच्या शर्यतीत आता नवे समीकरण तयार झाले आहे.






