स्टेडियम गेटवरही झाला वाद..
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पियन विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्ष, कुस्ती महासंघाशी झालेला वाद आणि निवड चाचणीवरील अनिश्चितता यानंतर अखेर शनिवारी ती एशियन गेम्स २०२६ च्या ट्रायलसाठी दिल्लीती दाखल झाली आहे. एशियन केम्स २०२६ चे तराईल्स दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम येथे होत आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करताना विनेश आणि तिचे पती सोमवीर राठी यांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. काही काळ गोंधळाचा वातावरण निर्माण झाला होता. यानंतर विनेशाचे मॅट-वर सराव करतानाचे फोटो-व्हिडीओ सोशल मिडीयार व्हायरल होत आहेत.
मुंबई : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ विकेट्स राखून पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. ...
सरवानंतर माध्यमांशी संवाद साधताना विनेशने सांगितले की, तिचे वजन तपासणी प्रक्रियेनंतर निश्चित करण्यात आले आहे. तिने ५३ किलो वजनाच्या कॅटेगरीमध्ये खेळणार आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला होता. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) ने विनेशला ट्रायलमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तिच्या सहभागाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
गोंडा स्पर्धेतून वादाला सुरुवात...#WATCH | Delhi: Wrestler Vinesh Phogat is participating in the Asian Games 2026 selection trials, at Indira Gandhi Stadium. Supreme Court allowed her yesterday to participate in the Asian Games 2026 selection trials. pic.twitter.com/aHaRWrtnHu
— ANI (@ANI) May 30, 2026
वादाची सुरुवात मे २०२६ मध्ये गोंडा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रमवारी स्पर्धेतून झाली होती. निवृत्तीनंतर पुनरागमन करताना सहा महिन्यांची पूर्वसूचना न दिल्याचा आरोप करत WFI ने विनेशवर बंदी घातली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय देत ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.विशेष म्हणजे, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अवघ्या १०० ग्रॅम जास्ती वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये तिने पुनरागमनाची घोषणा करत पुन्हा मॅटवर परतण्याचा निर्णय घेतला.आता सर्वांचे लक्ष एशियन गेम्स ट्रायलकडे लागले आहे. दीर्घ संघर्षानंतर मॅटवर उतरलेली विनेश फोगाट दमदार पुनरागमन करते का, याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.





