Nashik : विधान परिषद निवडणुकीत हालचालींना वेग, भाजपचे गणेश गीते यांचे दोन अर्ज दाखल

नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आज, शनिवारी, भाजपचे गणेश बबनराव गीते यांनी पक्षाच्या वतीने एक आणि अपक्ष म्हणून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


आज एकूण १४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून त्यामध्ये विविध पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे.अनिकेत विजय पाटील यांनी भाजप आणि अपक्ष अशा दोन्ही प्रकारचे अर्ज घेतले आहेत. तसेच बापू विश्वनाथ पिंगळे यांनी भाजपच्या वतीने अर्ज घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून विजय किसन करंजकर यांनी तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून अनिल साहेबराव कदम यांनी अर्ज घेतले आहेत. याशिवाय संजय खंडेराव गिते, मंगेश विजय खैरनार आणि गोकुळ बबन गीते यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. गोकुळ गीते यांनी भाजप आणि अपक्ष अशा दोन्ही पर्यायांचे अर्ज घेतल्याचीही नोंद आहे. एकूण १४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.




पक्षनिहाय अर्जांची स्थिती


भाजप : ५


शिवसेना (शिंदे गट) : १


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) : २


अपक्ष : ६




अर्ज घेतलेल्या उमेदवारांची यादी


अनिकेत विजय पाटील : भाजप (२), अपक्ष (२)


संजय खंडेराव गिते : अपक्ष (१)


बापू विश्वनाथ पिंगळे : भाजप (२)


मंगेश विजय खैरनार : अपक्ष (१)


विजय किसन करंजकर : शिवसेना (शिंदे गट) (१)


अनिल साहेबराव कदम : शिवसेना (उ.बा.ठा.) (२)


गोकुळ बबन गीते : अपक्ष (२), भाजप (१)

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती