Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती नारोशंकर यांना लिहिलेले सुमारे २८० वर्षे जुने पत्र सापडले आहे. या पत्रातून मुघलांच्या पराभवानंतर बुंदेलखंडातील मराठ्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर प्रकाश पडत आहे. नानासाहेबांची राजमुद्रा आणि स्वाक्षरी असलेले हे पत्र मोडी लिपीत लिहिलेले आहे. त्यामध्ये करेरा तसेच आसपासच्या अखबराबाद आणि दमरौन परगण्यांतील प्रशासकीय व्यवस्था, जागीरदार व जमीनदारांच्या नियुक्त्या, नजराणा तसेच इतर कर व देयकांची माहिती देण्यात आली आहे. ‘ज्ञान भारतम्’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान राज्य पुरातत्त्व संग्रहालय व अभिलेखागाराचे पुराविद् डॉ. वसीम खान यांना हे पत्र इतरत जैदी यांच्या खासगी संग्रहात आढळून आले.



जैदी हे करेरा येथील मानसबदार राहिलेले सैयद असगर अली खान यांचे वंशज आहेत. सर्वेक्षणादरम्यान दतिया येथे सेनापती नारोशंकर यांची हवेलीही आढळून आली असून, तेथे त्या काळातील अनेक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत. दतियाचे जिल्हाधिकारी स्वप्निल वानखेडे यांनी या हवेलीच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. नारोशंकर हे १७२९ मध्ये बाजीराव प्रथम यांच्यासोबत बुंदेलखंडात गेले होते. मुघल सेनापती मुहम्मद खान बंगश याच्याविरोधात राजा छत्रसाल यांच्या मदतीसाठी बाजीरावांनी केलेल्या मोहिमेत नारोशंकर सहभागी झाले होते. पुढे ते बुंदेलखंडातील मराठा सत्तेतील प्रमुख व्यक्तींपैकी एक बनले. पुरातत्त्व व अभिलेखागार विभागाचे आयुक्त मदन कुमार नागरगोजे यांनी ‘ज्ञान भारतम्’ मोहिमेत दतिया येथून अनेक दुर्मीळ ऐतिहासिक दस्तऐवज मिळाले असून, त्यांचे जतन करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.



नारोशंकर कोण होते? : नारोशंकर हे मराठा साम्राज्यातील प्रमुख सेनापतींपैकी एक होते.१७२९ मध्ये बाजीराव प्रथम यांच्यासोबत ते बुंदेलखंडात गेले होते. मुघल सेनापती मुहम्मद खान बंगश याच्याविरोधात राजा छत्रसाल यांच्या मदतीसाठी बाजीरावांनी केलेल्या मोहिमेत नारोशंकर सहभागी झाले. पुढे बुंदेलखंडातील मराठा प्रशासनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दतिया येथे नारोशंकरांची ऐतिहासिक हवेलीही आढळून आली असून, तेथे त्या काळातील अनेक दस्तऐवज असल्याचे समोर आले आहे.


२८० वर्षे जुने पत्र काय सांगते? : मोडी लिपीतील या पत्रात करेरा, अखबराबाद आणि दमरौन परगण्यांच्या प्रशासनाची माहिती असून जागीरदार-जमीनदारांच्या नियुक्त्या, नजराणा आणि इतर देयकांचा उल्लेख आहे. नानासाहेबांची राजमुद्रा आणि स्वाक्षरी असलेले हे पत्र बुंदेलखंडातील मराठा सत्तेच्या प्रशासनाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा मानला जातो.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि