महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने भेसळ केलेले ७६१ लिटर दूध जप्त करून नष्ट केले. दूध भेसळीसाठी स्किम मिल्क पावडरचा पुरवठा करणाऱ्या भास्कर डेअरीवरही कारवाई करून ५४८ किलो साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने पी. के. डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद केला आहे तसेच भास्कर डेअरीचा अन्न परवाना निलंबित केला आहे.
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम नगरच्या मॉडर्न बेकरी जंक्शन परिसरात ही घटना ...
ठोस गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पी. के. डेअरीवर धाड टाकली. धाड टाकली त्यावेळी डेअरी परिसरात आयशर कंपनीचा दूध टँकर उभा होता. टँकरवर असलेल्या शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (३४) याला दुधाची पाकिटे फोडून त्यातील दूध, स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या साहाय्याने थंड केलेले पाणी यांचे मिश्रण तयार करून ते टँकरमधील दुधात मिसळताना पथकाने मुद्देमालासह पकडले. चौकशीदरम्यान एका किलो स्किम मिल्क पावडरमध्ये आठ ते दहा लिटर थंड पाणी मिसळून मिश्रण तयार केले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आले. नंतर प्लंजरच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून टँकरमधील गायीच्या आणि म्हशीच्या दुधात मिसळले जात होते. भेसळीचे काम प्रदीप यादवच्या माध्यमातून सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासा आढळले. भेसळयुक्त दूध गायीचे आणि म्हशीचे दूध असल्याचे सांगून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील विविध दूध डेअऱ्यांना पुरविले जात असल्याचेही तपासात उघड झाले. भेसळीसाठी पाश्चराईज्ड होमोजेनाईज्ड गायीचे दूध, पाश्चराईज्ड फुल क्रीम मिल्क, पाणी आणि स्किम मिल्क पावडर परिसरातील विक्रेत्यांकडून खरेदी केले जात होते.
नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागपूर उप-क्षेत्रीय ...
अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळांवरून दुधाचे नमुने प्रयोगशाळेतील सखोल तपासणीसाठी जप्त केले आहेत. पी. के. डेअरीकडे आवश्यक अन्न परवाना नसल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोटीस बजावून या डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उर्वरित दूधसाठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून ३९३ लिटर म्हशीचे दूध आणि ३६८ लिटर गायीचे दूध, असा एकूण ७६१ लिटर दूधसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत ४० हजार ५५८ रुपये असून, संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.
नाशिक : मालेगाव परिसरात नशेच्या गोळ्या व औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपींवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ...
पी. के. डेअरीला स्किम मिल्क पावडर पुरविणाऱ्या भास्कर डेअरीतून स्किम्ड मिल्क पावडर आणि पनीरचे नमुने घेण्यात आले. तसेच भास्कर डेअरीतून कमी दर्जाचा ५४८ किलो साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत एक लाख ८३ हजार ३२० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने भास्कर डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे चक्क घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावण्यात आली ...
विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.