Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क यंदा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे गणेशभक्तांना एसटीने अधिक स्वस्तात गावी जाता येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी या निर्णयाची माहिती दिली. गणेशोत्सव आणि एसटी महामंडळाचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून दरवर्षी हजारो कोकणवासी गणेशोत्सवासाठी एसटीने आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे पाच हजार एसटी बसचे आरक्षण केले जाते. (Pratap Sarnaik)



प्रवाशांना त्यांच्या गावी सोडल्यानंतर या बस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे महामंडळाला इंधनासह चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती तसेच कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या निर्णयामुळे गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार असून एसटीच्या गट आरक्षणाला यंदा अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.


गणेशोत्सव मंडळे आणि कोकणवासीयांकडून हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. यासंदर्भातील निवेदनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आली होती. कोकणवासीयांची मागणी आणि गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. (Pratap Sarnaik)


अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिक भार वाढणार आहे. हा भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक

Traffic and Power Block : दिवा स्थानकावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कामामुळे लोकल सेवांवर परिणाम

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुवि

Sachin Ahir : वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात; उपसभापती सचिन अहिर

मुंबई महापालिका आयुक्तांसोबत उपसभापती सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण