Friday, May 29, 2026

Monsoon Alert : येत आहे १०० किमी वेगानं महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

Monsoon Alert : येत आहे १०० किमी वेगानं महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून अजून भारताच्या विविध भागांमध्ये पूर्णपणे पसरलेला नसला तरी, अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाने वायव्य भारतात तीव्र चक्रीवादळे, गारपीट आणि मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे.

पुढील ४८ तासांमध्ये देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये अतिवेगवान वादळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड या भागांमध्ये ताशी १०० किलोमीटर वेगाने वादळ धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अजूनही

">उष्णतेची लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >