Friday, May 29, 2026

Bank Holidays in June 2026 : जूनमध्ये बँकांना तब्बल ११ दिवस सुट्टी; व्यवहारांपूर्वी ‘ही’ यादी नक्की तपासा

Bank Holidays in June 2026 : जूनमध्ये बँकांना तब्बल ११ दिवस सुट्टी; व्यवहारांपूर्वी ‘ही’ यादी नक्की तपासा

मुंबई : मे महिना संपत आला असून सोमवारपासून जून महिन्याला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत बँकेतील महत्त्वाची कामे करण्याचे नियोजन करत असाल, तर जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जून 2026 महिन्यातील बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली असून, त्यानुसार देशभरातील बँका एकूण ११ दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holidays in June 2026)

दर महिन्याप्रमाणे जूनमध्येही रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या तसेच दुसरा आणि चौथा शनिवार यामुळे बँकांचे कामकाज बंद राहील. याशिवाय विविध धार्मिक सण, प्रादेशिक उत्सव आणि स्थानिक कार्यक्रमांमुळे काही राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्याही असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँक व्यवहारांचे नियोजन करताना आपल्या राज्यातील सुट्ट्यांची माहिती आधी तपासणे आवश्यक आहे. (Bank Holidays in June 2026)

जून महिन्यातील प्रमुख बँक सुट्ट्या :

- ७ जून – रविवार - १३ जून – दुसरा शनिवार - १४ जून – रविवार - २१ जून – रविवार - २७ जून – चौथा शनिवार - २८ जून – रविवार

याशिवाय विविध राज्यांमध्ये विशेष सण आणि उत्सवानिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. (Bank Holidays in June 2026)

१५ जून रोजी अझिवल आणि भुवनेश्वर येथे वायएमए दिवस आणि राजा संक्रांती निमित्त बँका बंद राहतील. मोहरमनिमित्त २५ जून रोजी विजयवाडा येथे बँकांना सुट्टी असेल. तर २६ जून रोजी मोहरममुळे नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पाटणा आणि श्रीनगरमधील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. (Bank Holidays in June 2026)

तसेच २९ जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त शिमला येथे बँका बंद असतील, तर ३० जून रोजी रेमना नी उत्सवानिमित्त अझिवलमधील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Bank Holidays in June 2026)

डिजिटल बँकिंग सेवा सुरूच राहणार : 

बँकांना सुट्टी असली तरी ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय व्यवहार, एटीएम सेवा आणि ऑनलाइन पैसे ट्रान्सफर सुविधा नियमित सुरू राहतील. त्यामुळे निधी हस्तांतरण, बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज किंवा ऑनलाइन खरेदीसारखे व्यवहार सहज करता येतील. (Bank Holidays in June 2026)

मात्र, चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, खाते उघडणे, कर्ज प्रक्रिया, लॉकर सेवा किंवा इतर शाखेशी संबंधित कामांसाठी ग्राहकांनी बँकेचे नियमित कामकाज सुरू असलेल्या दिवशीच शाखेत भेट देणे आवश्यक आहे.

दरम्यान, सलग सुट्ट्यांच्या काळात एटीएममध्ये गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी रोख रकमेची आवश्यकता आधीच पूर्ण करून ठेवावी, असा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. (Bank Holidays in June 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >