इन्शुरन्सपासून सुरू झाली ओळख; लग्नाच्या बहाण्याने लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Crime News : कल्याणमध्ये एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाचं आमिष दाखवत तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दोन महिलांनी एकत्र मिळून या व्यावसायिकाला प्रेम आणि लग्नाच्या जाळ्यात अडकवत मोठा आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
इन्शुरन्समुळे झाली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील एका प्रसिद्ध दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशीशी करून दिली. रोमा एका मोठ्या इन्शुरेंस कोमपणीत काम करते असं म्हण जवळीक वाढली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली विश्वास जिंकण्यात आले. त्यानंतर रोमा परदेशी हिने विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून लाखो रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही पॉलिसी काढण्यात आली नसल्याचं पुढे उघडकीस आले.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे २०२६ रोजी एक मोठी विशेष मोहीम राबवली. या ...
लग्नासाठी होकार; त्यानंतर सुरू झाला पैशांचा खेळ
काही दिवसांनी जयश्री पाटीलच्या माध्यमातून रोमा परदेशी हिने संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयार असल्याचे सांगितले. व्यावसायिकानेही या नात्यासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगत पैशे मागणे सुरू केले. कधी कौटुंबिक अडचण, कधी गुंतवणूक, तर कधी लग्नाच्या तयारीच्या नावाखाली संबंधित व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले. तक्रारदाराच्या माहितीनुसार, या दोघांना व्यावसाकाने आतापर्यंत तब्बल ५५ लाख रुपये देण्यात आले होते.
फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव
दीर्घकाळ पैसे देऊनही लग्नाबाबत कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने व्यावसायिकाला शंका झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती. नंतर तिला जामीन मिळाला. तपासादरम्यान तिची मैत्रीण जयश्री पाटील हिचा सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला कोल्हापूरमधून अटक केली आहे.
दक्षिण लेबनॉनमधील ( southern Lebanon) परिस्थिती चिघळली असून इस्रायली हवाई दलाने (IAF) हिजबुल्लाहच्या तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक हल्ला केला आहे. ...
माझे पैसे परत मिळावेत – व्यावसायिकाची मागणी
तक्रारदार व्यावसायिकाने आरोपी महिलांकडून आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत मोठी फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींकडून रक्कम वसूल करून मला न्याय मिळावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत.






