Nashik : “मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी वेळ काढून…”; उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे महिला सहकाऱ्यासोबत अश्लील चाळे

Nashik Crime : नाशिक येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने महिला सहकाऱ्यासोबत अश्लील चाळे केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात (Nashik division of ST Corporation) हा संतापजनक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमके प्रकरण काय ?


एसटी महामंडळाच्या शिंगाडा तलाव, आगार क्र. १ (एन. डी. पटेलरोड) येथे सहायक वाहतूक अधीक्षक म्हणून विजय विश्वनाथ निकम (४५) हा कार्यरत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३६ वर्षीय विवाहित पीडित महिला बळी महाराज मंदिर चौफुली (पंचवटी) जवळील बायपास बुकिंग ऑफिस व भरारी पथकात कार्यरत आहे.



मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी वेळ काढून माझ्या घरी ये


६ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पीडिता तेथे कर्तव्य बजावत असताना संशयित विजय निकम तेथे आला. त्याने पीडितेचा पाठलाग करुन, ‘तू गाडीत बस, एक चक्कर मारून येऊ, मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हटले. ’ पीडित महिलेने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर निकम गाडीतून खाली उतरला आणि त्याने जबरदस्तीने महिलेला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. महिलेने या गोष्टीस पुन्हा नकार दिला असता संशयित निकम याने तिचा उजवा हात पकडला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी वेळ काढून माझ्या घरी ये’ असे म्हणत त्याने अश्लील संवाद साधून प्रेमाची मागणी केली. या कृत्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.



संशयित गैरहजर, पोलिसांकडून तपास


संशयिताकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित विजय निकम हा कायदेशीर कारवाईच्या भीतीने पसार झाला आहे. तो आपल्या कार्यालयातही हजर झाला नसल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत. या प्रकारानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या