जर्मनीत इंग्लंड-स्पेनचे फुटबॉल चाहते भिडले
लाइपझिग (वृत्तसंस्था):
युरोपियन कॉन्फरन्स लीगच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी जर्मनीतील लाइपझिग शहराला हिंसक गालबोट लागले आहे. इंग्लंडचा 'क्रिस्टल पॅलेस' आणि स्पेनचा 'रायो वॅलेकॅनो' यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यामुळे सामन्यापूर्वी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रेस्टॉरंटबाहेर क्रिस्टल पॅलेसचे चाहते बसले असताना अचानक सुमारे ३०० रायो वॅलेकॅनो समर्थकांचा गट तिथे धडकला. दोन्ही गटांतील शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काचेच्या बाटल्या, बिअरचे ग्लास आणि रेस्टॉरंटमधील खुर्च्यांची फेकाफेक केली. यानंतर दुसऱ्या एका घटनेत ६० क्रिस्टल पॅलेस समर्थकांनी स्पॅनिश चाहत्यांना पुन्हा चिथावणी दिल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जर्मन पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. या मोहिमेत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी तात्काळ
लंडन (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात (१२ जून) सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ आपली अंतिम तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान ...







