Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) हा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिले बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित करुन गोरेगाव - मुलुंड जोड रस्‍ता प्रकल्‍पांतर्गत बोगदा खोदकामास सोमवारी १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारंभ करण्‍यात आला आहे. बोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य 'टनेल बोअरिंग मशिन'चे 'तुळशी' असे नामकरण करण्यात आले आहे. ( Goregaon Mulund Link Road)


हा प्रकल्प साकारला गेल्यास पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून अवघ्या २० मिनिटांपर्यंत कमी होईल. परिणामी, प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच, पूर्व - पश्चिम उपनगरांमधील संपर्क क्षमता अधिक कार्यक्षम होईल. आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद वेळ कमी होईल.


या प्रकल्पामध्ये १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे, गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते यांचा समावेश असून, प्रकल्पाची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे संचलन व देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून टप्पा - १ व टप्पा - २ अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगी मिळाली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे तळमजला + २३ मजली अशा सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. ( Goregaon Mulund Underground Tunnel)



प्रकल्पात टनेल बोरिंग मशीन द्वारे बोगदा खोदकाम,तंत्रज्ञानाद्वारे क्रॉस पॅसेजचे बांधकाम, यांत्रिक वायुवीजन व्यवस्था मिस्ट आधारित अग्निशमन प्रणाली नियंत्रण प्रणाली, प्रकाशयोजना तसेच आधुनिक दिशादर्शक फलक यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, दुहेरी बोगद्यांमध्ये रस्त्याखाली उपयोगिता वाहिन्‍यांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक बोगद्यातून १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.


प्रकल्पाच्या गुणवत्ता नियंत्रण व देखरेखीसाठी मेसर्स टिप्स्या इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार , भारतीय तंत्रज्ञान संस्‍था यांची फेरतपासणी सल्लागार तसेच व्हीजेटीआय, मुंबई यांची तृतीय पक्ष गुणवत्ता लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाची सुमारे २१% भौतिक प्रगती झाली आहे. टीबीएम १ ची जोडणी पूर्ण होऊन स्थळ स्वीकृती चाचणी देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. (GMLR)


टीबीएम२ ची जोडणी प्रगतिपथावर आहे. त्याद्वारे ऑक्टोबर २०२६ पासून खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे व्यावसायिक व औद्योगिक वाहतुकीला गती मिळेल आणि मुंबईच्या विद्यमान रस्ते जाळ्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन महानगराच्‍या एकूण वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक