CM Siddaramaiah Give Resignation : मोठी बातमी ! सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा, राजीनाम्याचे कारणही समोर

Karnataka : कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी थेट कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवस काँग्रेसमध्ये (Congress) मोठ्या हालचाली सुरु असल्याचं बोललं जात होतं. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तेचे खांदेपालट होणार असे बोलले जात होते. त्या दिशेने काँग्रेसने पाऊलही टाकले होते. असे असतानाच आता कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.


कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचेच नेते डी के शिवकुमार हे घेणार आहेत. माहितीनुसार येत्या 30 मे रोजी डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.



सिद्धरामय्या यांनी राजीनामा का दिला ?


तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी डी के शिवकुमार (DK Sivakumar) हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते देखील मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये प्रबळ दावेदार होते. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. परंतु सिद्धरामय्या यांचा राजकीय अनुभव मोठा असल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरलेला होता. अगोदरच्या अडीच वर्षात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असतील आणि नंतरच्या अडीच वर्षात डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसारच आता सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे.



डीके शिवकुमार काँग्रेसचे संकटमोचक


डीके शिवकुमार कर्नाटकमधील कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. एकदाही त्यांचा पराभव झालेला नाही. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून डीके शिवकुमार प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचे संकटमोचक म्हणून यशस्वी ठरले होते. गुजरातमध्ये 2017 च्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार त्यांनी निवडून आणला होता.

Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात