Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेचा तपास पुढे जात असताना फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. या प्रकरणात नौदल अधिकारी पूरणमल मेहरा, त्यांची पत्नी ओमा आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता.  मुंबईतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. (Mumbai News)



धक्कादायक खुलासे


तपासातील प्राथमिक माहितीनुसार, पूरणमल यांनी पत्नी ओमा आणि धाकटा मुलगा दर्श यांचा गुदमरवून जीव घेतल्याचा संशय आहे. त्यानंतर मोठा मुलगा यश याला विष देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या तिघांच्या मृत्यूनंतर पूरणमल यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Navy Suicide)



वडिलांना तो मेसेज पाठवला अन्


15 ऑगस्ट रोजी घटना उघडकीस येण्यापूर्वी पूरणमल यांनी मध्यरात्री आपल्या वडिलांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशात मृतदेह घेण्यासाठी येण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या मेसेजमुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे.




पत्नीच्या मोबाईलमधील डेटा


दरम्यान, पूरणमल आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाईलमधील डेटा हटवण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. त्यामुळे मोबाईलमधील डिलीट झालेली माहिती आणि इतर डेटा परत मिळवण्यासाठी सायबर पथक प्रयत्न करत आहे. मोबाईलमधील माहिती या घटनेच्या कारणांवर प्रकाश टाकू शकते, अशी शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.


पूरणमल गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय रजेवर होते आणि INHS अस्विनी येथे नैराश्यासाठी उपचार घेत असल्याची माहितीही समोर आली आहे. यापूर्वी त्यांनी आत्महत्येचे विचार व्यक्त केल्याचेही सांगण्यात येत आहे. आर्थिक अडचणी, कुटुंबीयांपासून असलेले अंतर आणि कौटुंबिक तणावामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.


या घटनेच्या सुमारे 10 दिवस आधी पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी पूरणमल यांनी पत्नीचा मोबाईल फोडल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. या सर्व बाबींचा तपास यंत्रणा सखोलपणे तपासत असून या सामूहिक मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. (Mumbai Crime)


Comments
Add Comment

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :