Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत पती-पत्नी यांची दोन वर्षांची मुलगी ही काठावरच होती. चौघांचा अशाप्रकारे बुडून मृत्यू झाल्याने आणि मृत दाम्पत्याची लेक पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणात नाशिकच्या हरसुल पोलीस ठाणे (Harsul Police Station) येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



नेमकी घटना काय घडली ?


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरसुल पोलीस स्टेशन हद्दीत (Harsul Police Station) असलेल्या कश्यपी धरण येथे नाशिक (Nashik० येथे राहणारे मयत सचिन ठोंबरे (Sachin Thombre) आणि रोहिणी ठोंबरे (Rohini Thombre) हे पती-पत्नी आणि त्यांच्या घराशेजारी राहणारे केतन पवार (वय 17) आणि कौशल पवार (वय 14) हे कश्यपी धरण येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते चोघे पाण्यात उतरले त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं ते चौघेही बुडाले. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.


धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत पती-पत्नी यांची दोन वर्षांची चिमुकली ही काठावरच होती. सुदैवाने ती या घटनेत वाचली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्या धरण काठावर पोलिसांना ही चिमुरडी आढळून आली. तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. दोन वर्षाची चिमुकली पोरकी झाल्याने आणि अशाप्रकारे काठावर आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला.



घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह हे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर रात्र होण्याआधीच स्थानिकांना चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हे चारही मृतदेह पाठविण्यात आले आहेत.


घटनेबाबत हरसूल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हरसूल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांकडून धरण परिसरात गर्दी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने देखील अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची